Loading College Website...
सन वर्ष 2000 पासून कन्नडमध्ये संस्थेचे अध्यक्ष आ. मा. आ. प्रा. किशोर पाटील साहेबांनी महाविद्यालय स्थापन करून ग्रामीण भागामध्ये उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. किशोर पाटील साहेब हे आपल्या जन्मभूमी असलेल्या कन्नडमध्ये महाविद्यालय स्थापन करून मातृभूमीचे ऋण फेडण्याचे काम करीत आहेत. विनायकराव पाटील यांच्या नावाने संस्था स्थापन करून त्यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने आपल्या संस्थेचे महाविद्यालय कन्नड येथे स्थापना झालेली आहे. सामाजिक बांधिलकी, लोकशाही निष्ठा, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रभक्ती, सामाजिक समता, स्वावलंबन महाविद्यालयातून निर्माण व्हावी यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न असतात. हे सर्व करण्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांचे सहकार्य आवश्यक असते.
मराठी विभाग संस्थेच्या स्थापनेपासून म्हणजेच सन 2000 पासून मराठी विषय भाषा म्हणून शिकवत आहे.
मराठी विभागाची प्रमुख भूमिका कॉलेजच्या स्पाथापने सून सुरू झाली. मराठी ही मातृभाषा असल्याने विद्यार्थ्यांना समजणे, व्यक्त करणे आणि संवाद साधणे सोपे जाते. ही एक प्रादेशिक भाषा देखील आहे, म्हणून, पदवी स्तरावर शिक्षणाचे एक माध्यम आहे. मराठी भाषा आणि साहित्याचा अभ्यास सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा समजून घेण्यास मदत करतो. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते.
अभ्यासक्रमाची उद्दिष्टये :
(१) विद्यार्थी हे केंद्र बिंदू मानून त्याचे भाषिक आकलन आविष्करण समृद करणे.
(२) प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्याचे वय / मानसिकता / क्षमता लक्षात घेऊन त्यांचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने अध्ययन सामुग्री देणे.
(३) प्रथम वर्ष हा पाया समजून पायाभूत वाङ्मयीन व भाषिक कौशल्याचे ज्ञान उपलब्ध करून देणारा अध्ययन क्रम सिद्ध करणे..
(४) मराठीतील जुन्या नव्या कवी / लेखकांच्या कलाकृतींचा परिचय व्हावा म्हणून निवडक काव्य / कथा/ कथांश सिद्ध करुन देणे.
(५) पदवी पातळीवरील अभ्यासक्रमाची सिद्धता ही पदव्युत्तर अभ्यासाची पूर्वतयारी असते याचे भान ठेवून अध्यापन साधने पुरवणे,
(६) स्पर्धा परीक्षेच्या / व्यावहारिक भाषिक कौशल्याच्या दृष्टीने भाषिक कौशल्याचे ज्ञान देणे.
(७) दैनंदिन भाषा वापर साहित्यातील उपयोग व कार्यालयीन उपयोजनांचा विचार.
(८) भाषेतील संवाद / उच्चार / लेखन/ विस्तार / शब्दसंग्रह यांचा परिचय.
(९) मराठी भाषेतील जुन्या / नव्या भाषेच्या वापराचा अर्थ काव्यार्थ, सूचकता तत्कालीन भाषिक शब्दकळा, परभाषा, पर्यावरण मानवी मूल्य, सुसंस्कार सामाजिक संदर्भ / सांस्कृतिकता याचा काव्य / गद्य अंशाच्या निमित्ताने परिचय:
१०) यादवकालीन सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक स्थिती गती लक्षात घेत त्या काळात जी ग्रंथरचना झाली तिच्याबद्दल माहिती करुन घेणे, ग्रंथनिर्मितीमागील प्रेरणा व त्यांचा प्रत्यक्ष ग्रंथरचनेवरील परिणाम अभ्यासणे.
११) बहामनीकाल ग्रंथनिर्मितीमागील प्रेरणा व त्यांचा प्रत्यक्ष ग्रंथरचनेवरील परिणाम समजून घेणे.
१२) तत्कालीन महत्त्वाचे ग्रंथ, ग्रंथकार व ग्रंथविशेष यांचे आकलन करून घेणे.
१३) वाचन लेखन कौशल्याचा विकास
१४) समीक्षणात्मक दृष्टीचा विकास
१५) संशोधनात्मक दृष्टीचा विकास
१६) सिमा भागातील व आपल्या प्रादेशिक विशेषांचा भाषिक अभ्यास व संशोधन करणे.
१७) भाषा बोलीचे शब्दविशेष नोंदविणे.
) लोकजीवनातील ओवी, लोकगीते, उखाणे, लोककथा इ. संकलन व
मूल्यमापन करणे.